आमदार माऊली आबा कटके यांनी शिरूरकरांना घातली साद!नागरिकांचा त्यांना मिळत आहे उत्स्फूर्त प्रतिसाद!
शिरूर ( प्रतिनिधी ) - शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीतील राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गट उमेदवारांच्या प्रचारार्थ शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांच्या नेतृत्वात शहरातुन भव्य पद यात्रा व प्रचार रॅली काढण्यात आली . या रॅलीला नागरीकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला .
शिरूर शहरातील बाजार समिती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून ही भव्य प्रचार रॅली सुरू करण्यात आली.यावेळी या रॅली मध्ये शिरूर नगरपरिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे , व सर्व २४ नगरसेवक पदाचे उमेदवार यांचेसह बाजार समिती माजी सभापती शशिकांत दसगुडे, घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक सुधीर फराटे,राष्ट्रवादी चे जाकीरखान पठाण, तालुकाध्यक्ष रवींद्र काळे
, शहराध्यक्ष शरद कालेवार, सचिन उर्फ पप्पू राजापूरे,माजी नगराध्यक्ष नसीमखान, यासह शिरूर शहरातील नागरीक महिला कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्षाचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथुन काढण्यात आले ही ही निवडणुक प्रचार रॅली शहरातील मुख्य बाजार पेठेतुन पालखी मार्गावर काढण्यात आली .यावेळी शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर शहरात विकासात्मक कामे करण्याचे दृष्टीने शिरूर शहरातील नागरीकांना नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षाचे पॅनेल च्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.


