घड्याळ आणि तुतारी दोन्ही राष्ट्रवादी शिरूर नगरपालिका निवडणूक एकत्र लढणार कि महायुती होणार!
शिरूर ( प्रतिनिधी ) - शिरूर नगरपालिका निवडणुकीत वेगाने घडामोडी घडताना दिसत आहेत. प्रकाश शेठ धारीवाल यांच्या नेतृत्वाखालील शिरूर शहर विकास आघाडीने माघार घेतली. यानंतर सर्वच पक्षांनी निवडणूक लढाविण्यासाठी मोर्चे बांधणी सुरु केली.
राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत निवडणूकित रंगत आणली. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना एकत्रित महायुती म्हणून निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात होते. मात्र त्यांच्या मध्ये नगराध्यक्ष पदावरून रस्सीखेस सुरु असल्याचे दिसत होते.
मंगळवारी माजी आमदार अशोक पवार यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढाविणार असल्याचे जाहीर केले होते मात्र आत्ता मोठया घडामोडी घडताना दिसत आहेत. दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी आणि घड्याळ एकत्रित लढाविणार असल्याची चर्चा होत आहे महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी तुतारी व घड्याळ एकत्रित निवडणूक लढवीत असल्याचे चित्र आहे.
दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित निवडणूक लढवीत असल्यास पून्हा राजकीय समीकरण बदलणार असल्याचे चित्र दिसत आहे.शिरूर नगरपालिका निवडणुकित अनेक मोठया घडामोडी घडत आहेत. असे झाल्यास भाजपा स्वतंत्र पॅनल टाकून स्वबळावर निवडणूक लक्षविणार का? कोण कोणते पक्ष एकत्रित येतात हे पाहावे लागेल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास भाजपा, व काँग्रेस पार्टी काय भूमिका घेतात हेच पाहावे लागेल.


