प्रथम लोकनियुक्त सरपंच विठ्ठल घावटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरात पंचक्रोशी नागरिकांनी घेतला लाभ
2025-12-04 07:58:45
प्रथम लोकनियुक्त सरपंच विठ्ठल घावटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरात पंचक्रोशी नागरिकांनी घेतला लाभ
शिरूर (प्रतिनिधी ) - शिरूर ग्रामीणचे प्रथम लोकनियुक्त सरपंच विठ्ठल शेठ घावटे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये 300 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली तर 107 जणांचे आपल्या हृदयाची तपासणी केली 43 लोकांचे टुडे इको करण्यात आला. याच सोबत रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पंचक्रोशीतील युवकांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन मोठा प्रतिसाद देत 200 जणांनी रक्तदान केले. पंचक्रोशी चे भूषण ह भ प ज्ञानेश्वर माऊली रासकर महाराज यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . असल्याची माहिती विजय खोसे यांनी दिली.
यावेळी राहुल दादा पाचर्णे शिरूर तालुका
अध्यक्ष भाजपा,आबासाहेब सोनवणे माजी अध्यक्ष भाजपा, विक्रम पाचुंदकर (पंचायत समिती सदस्य), दादा पाटील घावटे, नामदेव घावटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे,आबासाहेब सरोदे,आदर्श सरपंच अरुण घावटे, शशिकांत शिर्के,शिरूर ग्रामीणचे विद्यमान सरपंच शिल्पा गायकवाड,जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे,भाजप महिला आघाडी शिरूर अध्यक्षा प्रियाताई बिरादार माजी नगरसेवक प्रविण दसगुडे,सुभाप जगताप उपसरपंच सचिन घावटे, बाबाजी वर्पे,संजय शिंदे,भरत बोऱ्हाडे, एडवोकेट शिवशंकर हिलाळ, पंकज कारखिले,सागर घावटे, विजय खोसे, नामदेव घावटे, बापू गाडेकर,वर्षाताई काळे माजी सरपंच तर्डोबाची वाडी यांच्यासह पंचक्रोशीसह तालुक्यातील अनेक मान्यवरांनी विठ्ठल घावटे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
या शिबिरांच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अनिकेत कटारिया, डॉ. स्वप्निल शिंदे, डॉ. किरण कवडे व त्यांच्या
सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात
आले होते. विविध उपक्रम यशस्वीपणे आयोजन करण्याचे काम प्रथम लोकनियुक्त सरपंच विठ्ठल शेठ घावटे मित्रमंडळाने केले. याचे सर्वत्र कौतुक होत आहे.