Ads
Ads

नेप्ती बायपास वरील टोल नाक्यावर स्थानिक नागरिकांना टोल माफी द्या - ऍड संतोष गायकवाड

नेप्ती बायपास वरील टोल नाक्यावर स्थानिक नागरिकांना टोल माफी द्या - ऍड संतोष गायकवाड


अहिल्यानगर ( प्रतिनिधी ) - नेप्ती बायपास येथे नुकताच टोलनाका सुरु झाला आहे. स्थानिक नागरिकांना सुद्धा टोल भरावा लागत असून कार्यरत कर्मचारी नागरिकांशी अरेरावी करत असून स्थानिक नागरिकांना टोल मधून सूट देण्यात यावी अशी मागणी ऍड संतोष गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली.
              शहरात जाण्यासाठी परिसरातील नागरिकांना येथील टोल नाका पास करून जावे लागत आहे. या भागात अनेक मंगल कार्यालय, हॉस्पिटल आहेत तसेच शेतकरी, व्यावसायिक व कर्मचारी यांना नेहमी ये जा करावी लागत असून त्यांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.
             60 कि. मी परिसरातील स्थानिक नागरिकांना टोल मधून सूट देण्यास केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग  मंत्री नितिन गडकरी यांनी 2022 मध्ये लोकसभेमध्ये जाहीर केले होते.सध्याच्या नियमानुसार 20 कि मी परिसरातील नागरिकांना टोल मध्ये सूट देण्यात आलेली असून त्या नियमांची अंमलबजावणी करावी अशी मागणी मानव अधिकार अभियानाचे अध्यक्ष ऍड संतोष देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली