Ads
Ads

पुणे जिल्हा अध्यक्षपदी दिनेश खैरे यांची निवड

पुणे जिल्हा अध्यक्षपदी 
श्री दिनेश खैरे यांची निवड..

अहिल्यानगर ( प्रतिनिधी ) -

श्री सत्यइंदिरा फाउंडेशन संस्था जयपूर, राजस्थान ( भारत) या नामांकित संस्थेद्वारे असाह्य, बेघर, गरीब ,गरजू,अनाथ मुले, शिक्षणापासून वंचित मुले व मुली, मजदूर लोक, एकल वयोवृद्ध, विधवा, शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण, महिला बालकल्याण, महिला सशक्तिकरण यासाठी कार्यरत असणारी सुप्रसिद्ध नामांकित सामाजिक श्री सत्यइंदिरा फाउंडेशन ही संस्था कार्य करते. दरवर्षी या संस्थेद्वारे सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, महिला बालकल्याण, आरोग्य, साहित्य, वैद्यकीय, या क्षेत्रामध्ये अतुलनीय कार्य , योगदान देणाऱ्या व्यक्तींची निवड सर्व राज्यांमधून केली जाते.
यावर्षी नौरोसजी वाडिया महाविद्यालयातील कार्यरत कर्मचारी कवी , साहित्यिक श्री दिनेश ताराचंद खैरे. यांची श्री सत्य इंदिरा फाउंडेशन या संस्थेने त्यांच्या अतुलनीय शैक्षणिक सामाजिक योगदानाबद्दल त्यांची पुणे जिल्हाध्यक्षपदी दिनांक (1 जून 2025 ते 31 मे 2027) पर्यंत दोन वर्षाकरिता निवड करण्यात आली असून श्री दिनेश खैरे यांना सत्यइंदिरा फाउंडेशनच्या संस्थापिका सुनिता स्मृती सारस्वत यांच्या सहीचे निवड पत्र नुकतेच प्राप्त झाले असून श्री दिनेश ताराचंद खैरे यांचा शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह व निवडपत्र देऊन गौरव करण्यात असून श्री सत्य इंदिरा फाउंडेशन संस्थेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री दिनेश ताराचंद खैरे . यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.