पुणे पिंपळे गुरव, (प्रतिनिधी )
मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या शहीद जवानांना आणि या हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना सांगवी पोलिस स्टेशन आणि स्थानिक नागरिकांकडून अभिवादन करण्यात आले.यावर्षी १६ व्या हुतात्मा स्मृतीदिनी सांगवी पोलिस स्टेशनमध्ये शहीद पोलीस अधिकारी आणि जवानांना पोलीस दल व शांतता समितीच्या सदस्यांनी आदरांजली अर्पण केली.
सांगवी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यावेळी बोलताना म्हणाले, "आजचा दिवस शौर्य, धैर्य आणि समर्पणाचा आहे. २६/११ च्या हल्ल्याने आपल्या देशातील पोलीस दलाच्या शौर्याची आणि राष्ट्राच्या सुरक्षिततेच्या प्रतिज्ञेची मोठी परीक्षा घेतली. आपण त्या सर्व शहीदांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत, ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाची रक्षा केली.यापुढेही आम्ही अशा भ्याड हल्ल्यांना कधीही सफल होऊ देणार नाही."
सांगवी पोलिस स्टेशनच्या शांतता समितीचे
संजय मराठे म्हणाले की "आपल्या पोलीस बांधवांनी 26/11 ला जी कामगिरी केली आहे ती कामगिरी खूप प्रेरणादायी व अभिमानास्पद आहे ही कामगिरी पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिली गेली आहे."
सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज कलकुटगे,पोलीस उपनिरीक्षक तेजश्री म्हैसाळे तसेच अन्य पोलीस कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शहीद हुतात्म्याच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी सांगवी पोलिस स्टेशनचे शांतता कमिटीचे संजय मराठे,विजय गायकवाड,पोलीस कर्मचारी विनोद साळवे,विशाल चौधरी,प्रमोद जराड,तुषार साळुंखे,सुहास रंगारी,राजेंद्र शिरसाट,अमित पांडे,प्रवीण पाईकराव,प्रवीण पाटील,सुहास डंगारे,सतीश मापारी,शशिकांत वाघुले,शशिकांत चव्हाण,दौलत कर,कुणाल धिवार,नितिन कांबळे,किरण वाणी आणि स्थानिक शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.


