शिरूर ( प्रतिनिधी ) - शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून याकडे पोलीस प्रशासन डोळेझाक करत आहे. या अवैध व्यवसाय वाल्यांकडून मोठ्या प्रमाणात धनलाभ होत असल्याची चर्चा सुरू शहरात होत आहे.
हातभट्टी दारू, गांजा, मटका, असे अनेक अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आज पर्यंत यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचे समजते. हे सर्व अवैध व्यवसाय पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे बोलले जात आहे. या अवैध व्यवसायिकाकडून वसुलीच्या कामासाठी पाच ते सहा जण कार्यरत असल्याचे समजते.
शिरूर शहरातील इंदिरा गांधी पुतळ्याजवळ तसेच इतर भागांमध्ये अवैधर रित्या मटका चालविणारे सुमारे 20 ते 25 जण असल्याची चर्चा सुरू शहरांमध्ये होत आहे. एका व्यवसायिकाकडून सुमारे 15 ते 20 हजार रुपये प्रमाणे दर महा यातून लाखो रुपयांची वसुली होत असल्याचे समजते आहे.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांनी लक्ष घालून सदरील अवैद्य व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी कारवाई करावी तसेच पोलीस ठाण्यातील त्या वसुली बहाद्दर पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी शिरूर शहरातील नागरिकांत मधून होत आहे.
1) शिरूर शहरासह पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले चोऱ्यांचे प्रमाण व त्या चोरांना पकडण्यात पोलिसांना आलेले अपयश पुढील भागात
2) अवैद्य व्यवसायातून दरमहा होणारी उलाढाल (क्रमश:)


