Ads
Ads

थिटे फार्मसी कॉलेज मार्फत मतदार जनजागृती अभियान

शिरूर ( प्रतिनिधी ) - थिटे फार्मसी कॉलेज मार्फत मतदार जनजागृती अभियान

श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेच्या सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म/बी. फार्म) राष्ट्रीय सेवा योजना आणि तहसीलदार कार्यालय शिरूर यांच्या संयुक्त विद्यमानाने मतदार जनजागृती अभियाना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
      दिनांक १५ नोव्हेंबर रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेमध्ये एकूण १४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला या स्पर्धेमध्ये स्नेहल कानडे हिने प्रथम क्रमांक, सार्थक गिरमकर यांनी द्वितीय क्रमांक, साक्षी शिर्के हिने तृतीय क्रमांक तर नेहा सरोदे हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. 
        दिनांक १६ नोव्हेंबर रोजी शिरूर येथील निवासी नायब तहसीलदार श्री विनय कौलवकर साहेब यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले तसेच मतदान Image प्रक्रियेमध्ये भाग घेण्यास सांगितले तसेच स्वतःच्या कुटुंबीयांना व आजूबाजूच्या सुज्ञ नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.
        महाविद्यालयाच्या वतीने श्री विनय कौलवकर साहेब यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शहा सर व डॉ. बाहेती सर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
     यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमार्फत शिरूर शहरामध्ये रॅली काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी शिरूर शहरातील नागरिकांना येणाऱ्या २० तारखेला विधानसभेच्या निवडणुकीत आपले बहुमोल मत देऊन लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले.
     डी. फार्मसी च्या विद्यार्थ्यांमार्फत मतदार जनजागृती जनजागृतीसाठी शिरूर बस स्थानक परिसर व इंदिरा गांधी पुतळा परिसर या ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले, तसेच सर्व उपस्थित नागरिकांमार्फत मतदार प्रतिज्ञा देखील घेण्यात आली.         
       इंदिरा गांधी पुतळा परिसर Image या ठिकाणी महाविद्यालयातील रॅलीचे स्वागत माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. राजेंद्र जगदाळे, श्री. वैभव शेठ खाबिया श्री. बबनराव वाळके गुरूजी,  श्री. बाळू शेठ देसरडा, श्री. शेखलाल तांबोळी,  श्री. पुष्पराज कोळपकर आदी मान्यवरांनी केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रा. विशाल कारखिले सर, प्रा. भक्ती बिडवे मॅडम तसेच मानसी गरदरे, निखिल केदारी, मोनाली परभणे, शिवानी अहिरे, पल्लवी पुदगाने, प्रतिक्षा ऊकरंडे इ. यांनी केले.
       अशा प्रकारे महाविद्यालयामार्फत मतदार जनजागृती निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.

Image