प्रतिनिधी ( प्रतिनिधी प्रमोद मुरेकर) -
पिंपळापुर ता. राळेगांव जि. यवतमाळ येथील रहिवाशी सारिका श्रीकृष्णा महाजन, गोपालकिष्ण विठ्ठल महाजन, पंकज मधुकर सातघरे,दिलीप चिंधु सातघरे, राजु चिंधु सातघरे,यांनी महावितरण कार्यालयकडे शेती पंपाला विज पुरवठासाठी अर्ज सादर केल्यानंतर ग्राहकास मुदतीत विज पुरवठा न दिल्यामुळे विघुत लोकपाल नागपुर यांनी महावितरणला दंड व शेतीसाठी विज पुरवठा देण्याचे आदेश दिले. .याबाबत वस्तुस्थिती अशी की
गोपालकिष्ण विठ्ठल महाजन, पंकज मधुकर सातघरे,दिलीप चिंधु सातघरे, राजु चिंधु सातघरे,रा पिंपळापुर यांनी दि. 17-12-21 रोजी अर्ज सादर केले. तर सारिका महाजन यांनी 31-3-22 रोजी अर्ज सादर केले. अर्ज केल्यानंतर महावितरणकडुन कोटेशन देण्यात आले ग्राहकाने कोटेशन रक्कमेचा भरणा केल्यानंतर सुध्दा ग्राहकास
दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी होवुन सुध्दा पाचही जणाना
महावितरण कडुन शेती पंपासाठी विज कनेक्शन देण्यात आले नाही.ग्राहकाने वेळोवेळी महावितरणकडे चौकशी केली असता महावितरणकडुन योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही . त्यामुळे ग्राहकाने ग्राहक तक्रार निवारण मंच अमरावती यांच्याकडे तक्रार दाखल केली.त्यावर दि.23-7-24 रोजी मंचाने सुनावणी घेवुन आदेश पारित केला.की निधी उपलब्ध झाल्यानंतर ज्येष्ठता यादी प्रमाणे अर्जदारास विज जोडणी देण्यात यावी. माञ ग्राहक तक्रार निवारण मंच अमरावती यांनी दिलेल्या निर्णयाने ग्राहकाचे समाधान न झाल्यामूळे ग्राहकाने विघुत लोकपाल नागपुर यांच्याकडे दि. 1-10 -24 तक्रार दाखल केली.
विज अधिनियम 2003 चे कलम 42 नुसार विजेचा पुरवठा करणे हे महावितरणचे कर्तव्य आहे.तसेच विज अधिनियम 2003 चे कलम 43 नुसार अर्जदाराने विज पुरवठ्याची मागणी करणारा अर्ज सादर केल्यानंतर एक महिन्याच्या आत व नविन जोडणी करिता
वितरण वाहिनीची क्षमता वाढ किंवा नविन वाहिनी उभारणे महावितरणला गरजेचे असल्यास नव्वद दिवसात काम पुर्ण करून विज पुरवठा देणे बंधनकारक आहे.पायाभुत सुविधाची उभारणी करणे हे महावितरणचे कर्तव्य असल्याचे मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपिल क्र. 7572/2011 मध्ये सुध्दा नमुद केलेले आहे.
विदयुत कायदा 2003 चे कलम 43 (1) नुसार महावितरणने नविन विज पुरवठा करण्याकरिता दिलेल्या कालमर्यादेचे पालन करणे गरजेचे असते. महाराष्ट्र विदयुत नियामक आयोग विनियम 2021 विनियम 5.8 नुसार अर्जदाराने कोटेशन रक्कमेचा भरणा केलेल्या दिंनाकापासुन 30 दिवसात व नविन विज वाहिनी उभारणे गरजेचे असल्यास नव्वद दिवसात विज पुरवठा देणे बंधनकारक आहे
.मा. विघुत लोकपाल नागपुर यांच्याकडे सदर तक्रार अर्जावर दि. 23-10-24 रोजी सुनावणी घेण्यात आली. सदर सुनावणी होवुन मा. विघुत लोकपाल नागपुर यांनी
दि. 6-12-24 रोजी आदेश पारित करुन पाचही ग्राहक यांना तिन महिन्याच्या आत शेतीसाठी कृषी कनेक्शन देवुन महाराष्ट्र विदयूत नियामक आयोग 2021 यांनी विज पुरवठा देण्यासाठी कालमर्यादा निश्चित केलेली आहे. त्यामुळे विज कनेक्शन देण्यास विंलब झाल्यास पन्नास रुपये प्रती आठवडा प्रमाणे किंवा ग्राहकाने भरलेल्या कोटेशन रक्कमेच्या दुप्पट रक्कम देण्याची तरतुद आहे.त्यामूळे महावितरणने ग्राहकास नव्वद दिवसाच्या आत विज पुरवठा दिल्यानंतर ग्राहकाना धनादेशाद्वारे भरपाई देण्यात यावी. व आदेशाची अमलबंजावणी करुन आदेशाच्या तारीखपासुन तिन महिन्याच्या आत अनुपालन अहवाल विघुत लोकपाल यांना सादर करावा असे आदेश दिले.
. सदर प्रकरणी विघुत लोकपाल नागपुर यांच्यासमोर महावितरणकडुन एन. जी. खंगार अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनी बाजु मांडली तर ग्राहकाच्या वतीने माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बुलढाणा जिल्हा अध्यक्ष व
विज ग्राहक संघटना शेगांव तालुका अध्यक्ष अंबादास पवार शेगांव यांनी बाजु मांडली .


