जागरूक मतदार हाच लोकशाही हाच आधार आहे - अण्णा हजारे जेष्ठ समाजसेवक
2024-11-12 11:20:27
पारनेर राळेगण सिद्धी ( प्रतिनिधी ) जागरूक मतदार हाच लोकशाही चा आधार आहे.मतदान करताना चारित्र्य संपन्न उमेदवारास मतदान केले पाहिजे असे मत जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. ते मतदार जागृती अभियान 2024 प्रसंगी बोलत होते. राळेगण सिद्धी येथे त्यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात करण्यात आले. ग्रामस्वराज्य अभियान शिरूर, ग्रामस्वराज्य अभियान प्रतिष्ठान,राष्ट्रीय युवा संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने व शिवाजी आबा खेडकर यांच्या पुढाकारातून मतदार जागृती अभियान 2024 चे आयोजन करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले कि,मताची किंमत कोणी करू शकत नाही. एका मतामुळे केंद्रीय मंत्रिमंडळ गडगडले होते. एका मताची ताकत आहे.मतासाठी दादागिरी करणारे, मतांसाठी पैसे
वाटणारे, जाती- धर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या उमेदवारा पासून मतदारांनी सावध राहिले पाहिजे. आपल्या एका मतामध्ये आपल्या देशाचे पर्यायाने आपल्या गावचे तालुक्याचे जिल्ह्याचे व शहराचे उज्वल भवितव्य घडविण्याची ताकद आहे. असा दृढ विश्वास मनात बाळगून निर्भयपणे मतदान केले पाहिजे. एका मताची ताकद ओळखून मतदारांनी जागृत राहिले पाहिजे. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार जागृती अभियान करण्याची आवशकता आहे. या अभियानाचे कौतुक केले. यामुळे जागृत होऊन मतदानाची टक्केवारी वाढून चारित्र्यसंपन्न उमेदवारास मतदार विधानसभेत पाठवतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी शिवाजी आबा खेडकर,अभिषेक देवकर, अभिजीत जावळे, तुषार कुटे, अक्षय बडे, सौरव ओव्हाळ, भगवान श्रीमंदिलकर उपस्थित होते.