Ads
Ads

पुणे जिल्हा परिषद लिपीक वर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पदी इंद्रजीत जाधव व सचिव पदी मनोहर वन्नम

पुणे जिल्हा परिषद लिपीक वर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पदी इंद्रजीत जाधव व सचिव पदी मनोहर वन्नम

पुणे (प्रतिनिधी ) - पुणे जिल्हा परिषद लिपीक वर्गीय

 कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पदी

 इंद्रजीत जाधव व सचिव पदी मनोहर

 वन्नम यांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य लिपिक वर्गीय संघटना ६१५ 

पुणे जिल्ह्यातील कार्यरत असुन

 सन २०१५ पासून शेखर गायकवाड हे अध्यक्ष

 म्हणून तर किशोर कुलकर्णी सचिव म्हणून

 काम करत होते, संबंधित दोघांचा 

कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी त्यांच्याकडील 

पदाचा राजीनामा राज्य संघटनेचे  कार्याध्यक्ष उमाकांत सुर्यवंशी यांच्याकडे सुपूर्त केला होता. त्या अनुषंगाने संघटनेची जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. 

बैठकीत अध्यक्ष सचिव यांचा राजीनामा मंजुर करण्यात आला. त्यामुळे रिक्त पदावर पद नियुक्ती करणे गरजेचे होते. 

त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर या पुर्वी प्रभावी व्यक्तिमत्त्व तसेच तालुका अध्यक्ष पदी कार्य केले व सध्याचे संघटनेचे

 उपाध्यक्ष पद भुशवीत असलेले श्री इंद्रजीत जाधव यांच्या नावास बैठकीत उपस्थित असलेले संघटनेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी अनुमती दर्शविली त्या अनुषंगाने श्री इंद्रजीत जाधव यांची अध्यक्षपदी व मनोहर वन्नम यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.या वेळी राज्य कार्याध्यक्ष श्री उमाकांत सुर्यवंशी मावळते अध्यक्ष श्री शेखर गायकवाड सचिव श्री किशोर कुलकर्णी, नाना साहेब मार्कड,बालाजी पारसकर, विकास पापळ, शशी कालेकर, करंजकर मॅडम, प्रशांत किराड, वैभव लवटे, रवलिंग यादव, सुनील भापकर आदी पदाधिकारी कारी कर्मचारी हे उपस्थित होते.