Ads
Ads

शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणीची 21 डिसेंबर ला तयारी पूर्ण  - अभिजीत जगताप  निवडणूक निर्णय अधिकारी

शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणीची 21 डिसेंबर ला तयारी पूर्ण  - अभिजीत जगताप  निवडणूक निर्णय अधिकारी

शिरूर (प्रतिनिधी ) - 

शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी रविवार दि.२१ डिसेंबर रोजी होणार आहे.सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरुवात होणार असून सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत जगताप यांनी नगरपरिषदेच्या सभागृहात पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले.

        यावेळी सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी प्रीतम पाटील प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ उपस्थित होते.पुढे माहिती सांगताना जगताप म्हणाले की,शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवार दि.२ डिसेंबर २०२५ रोजी ३६ मतदान केंद्रावर मतदान पार पडले आहे.या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून शिरूर नगरपरिषद कार्यालयाच्या तळमजला येथे रविवार दि.२१ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे.बारा प्रभागानुसार मोजणीसाठी बारा टेबल असणार असून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना बारा टेबलवर बारा प्रतिनिधी तर नगरसेवकपदाच्या उमेदवारांना एक प्रतिनिधी देण्याची मुभा असणार आहे.काही प्रभागांची मतमोजणी दोन,काही तीन तर काही चार फेऱ्यांमध्ये पुर्ण होईल.साधारण दोन तासात मोजणी प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करुन मतमोजणी केंद्रात प्रवेश पास दिलेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे त्याचबरोबर मोबाईल नेण्यास परवानगी नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत जगताप यांनी सांगितले.