शिरूर पंचायत समिती सभापती पदी स्वाती विठ्ठल घावटे यांची तर उपसभापती पदी रामभाऊ सासवड यांची बिनविरोध निवड
शिरूर ( प्रतिनिधी ) - शिरूर पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक संपन्न झाली. सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्वाती विठ्ठल घावटे तर भाजपाच्या वतीने मनीषा पाचंगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उपसभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामभाऊ सासवडे तर भाजपाकडून सागर देवकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
भारतीय जनता पार्टीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध करत आपली उमेदवारी माघारी घेतली.
पंचायत समिती सभापती पदी स्वाती विठ्ठल घावटे तर उपसभापती पदी रामभाऊ सासवडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी घोषित केले. सहाय्यक निवडणूक निर्णय
अधिकारी म्हणून महेश डोके यांनी काम पहिले.


