शिरूर शहरात आधार केंद्र चालकाकडून होते आहे लूट! प्रशासन मात्र आहे सुस्त! जिल्हाधिकारी साहेब जरा लक्ष द्या की!
शिरूर (प्रतिनिधी ) -
शिरूर शहर व तालुक्यामध्ये आधार केंद्र चालकाकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात केली जात आहे.आधार कार्ड अपडेट किंवा नवीन काढण्यासाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात अवाजवी शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर येत असून प्रशासनाकडून याकडे सोईस्कर रित्या दुर्लक्ष केले जात आहे.या विरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शासकीय आधार नोंदणी केंद्रे बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. नोंदणी केलेल्या आधार केंद्र च्या पत्त्यावर केंद्र सुरू नसल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. आधार केंद्र चालक हे शासकीय जागेत आपले केंद्र न सुरू करता आपल्या खाजगी जागेत केंद्र चालवत असल्याचे निदर्शनास येत आहे.अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन, संबंधित आधार केंद्र चालकांक वरती कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नागरिकांना आधार कार्डसारख्या महत्त्वाच्या सेवेसाठी त्रास होऊ नये म्हणून शिरूर च्या पोस्ट ऑफिस येथे १८ मे २०१८ रोजी आधार केंद्र सुरु करण्यात आले.त्यांच्या च हस्ते आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती केंद्राचे उद्घाटन करण्यात आले होते. त्या वेळी शहरातील काही शासकीय आधार केंद्रे सुरू करण्यात आली होती; मात्र काही काळानंतर ही केंद्रे बंद पडल्याचे चित्र दिसत आहे.नागरिक जेव्हा या ठिकाणी आधार अपडेटसाठी जातात, तेव्हा केंद्र बंद असल्याचे निदर्शनास येत असल्याने त्यांना नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. इतर जिल्ह्यातील आधार केंद्रांचा आयडी वापरून शिरूर शहरामध्ये अनाधिकृतपणे आधार केंद्र सर्रासपणे चालविले जात असल्याचे चित्र दिसत आहे. संबंधित आधार केंद्र चालकांचे व आपले सरकार केंद्र चालकांचे चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
प्रांताधिकारी किंवा तहसीलदारांनी यानी केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करणे गरजेचे असतानाही अद्यापपर्यंत पाणी केली नसल्याचे निदर्शनास येत आहे. स्थितीचा आढावा घेतलेला नसल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. परिणामी नागरिकांना खासगी केंद्रांचा आधार घ्यावा लागत असून तेथे नियमापेक्षा जास्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
शिरूर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथे सर्व शासकीय कार्यालये, शासकीय व खाजगी बँका, शाळा-महाविद्यालये तसेच मोठी बाजारपेठ आहे. शिरूर तालुक्यासह शेजारील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील नागरिक विविध कामांसाठी येथे येत असतात. त्यामुळे आधार कार्ड अपडेट किंवा नवीन नोंदणीसाठी अधिकृत केंद्रांच्या शोधात नागरिकांची मोठी धावपळ होत आहे.
नागरिकांकडून प्रशासनाने अधिकृत आधार केंद्रे नियमित सुरू ठेवावीत, नियमाप्रमाणे शुल्क आकारले जात आहे का याची आठवड्यातून किमान एकदा तपासणी करावी, तसेच शहर व तालुक्यातील अधिकृत केंद्रांची आणि निश्चित शुल्काची यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्ष प्रिया बिरादार यांनी केली आहे. अन्यथा शहर भाजपा महिला आघाडी सह अनेक विविध संस्था व संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.(क्रमशः )


