Ads
Ads

शिरूर तहसील कार्यालयात वाढली एजंटांची मुजोरी!अधिकारी व कर्मचारी कशी चालवून देत आहेत ही मक्तेदारी!

शिरूर तहसील कार्यालयात वाढली एजंटांची मुजोरी!अधिकारी व कर्मचारी कशी चालवून देत आहेत ही मक्तेदारी!

शिरूर ( प्रतिनिधी ) - 

 शिरूर तहसील कार्यालयात एजंटांची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढली असून, कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची मुजोरी का चालवून देत आहेत हा प्रश्न उपस्थित होत आहे.

             अधिकाऱ्यांचे साठेलोटे असल्याने एजंटांची मक्तेदारी वाढली आहे.शिरूर तहसील कार्यालयातील कामकाज चर्चेत आले आहे, ते तेथील फोफावलेल्या एजंटगिरीमुळे काही एजंटांची मुजोरी इतकी वाढली आहे की, तहसीलमधील सर्व विभागातील कार्यालयात जाऊन ते शासकीय कामकाजात हस्तक्षेपही करू लागले आहेत.असे असताना अधिकारी मात्र मौन बाळगून असल्याने नागरिकांमधून आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. 

     तहसील कार्यालयात पुरवठा विभाग,तलाठी कार्यालयातील गुंठेवारी नोंदी,गौण खनिज,संजय गांधी योजना शाखा,अभिलेख रेकॉर्डरुम शाखा ,महसूल,,सेतूसह इतर शाखा कार्यालयांचे कामकाज चालते.या सर्वच कार्यालयांत एजंटांची ऊठबस आहे.कार्यालयांचे Image कामकाज सुरू होण्याअगोदर एजंट हजर असतात.काहींनी संघटनांची तर काहींनी राजकीय व सामाजिकसह विविध कार्यकर्त्यांची झूल पांघरली आहे. 

ठराविक कार्यालये आणि अधिकारी त्यांनी लक्षच केली आहेत.दिवस-दिवसभर अधिकाऱ्यांसमोरच बसुन विविध प्रकारचे दाखले,उतारे,रेशनकार्ड,केसेस यांसह कार्यालयातील विविध विभागांतील लोकांची कामे घेऊन येणे.ती अधिकार्‍यांकडून लक्ष्मीदर्शनाने  करून घेतली जात असून सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत मार्गी लागत नसल्याने त्यांच्यावर मात्र तहसिल कार्यालयाच्या पायऱ्या झिजवण्याची वेळ आली असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधुन उमटत आहेत.

बरं ही मंडळी लोकांच्या प्रति असणार्‍या कळवळ्यापेाटी कामे करतात असेही नाही.तर या बदल्यात त्यांच्याकडून दोन हजार,चार हजार तर कधी दहा हजार तर काही प्रकरणांमध्ये त्यापेक्षाही जास्त प्रमाणात पैसे उकळतात.नागरिकांची कामे वेळेत मार्गी लागत नसल्याने हेलपाटा नको म्हणून लोक पैसे देतात.अधिकार्‍यांकडून काम करून घेताना संबंधित प्रकरणाची कागदपत्रे पूर्ण Image आहेत का याचीही खातरजमा केली जात नसल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे.अपुरी कागदपत्र असतानाही अधिकाऱ्यांकडून लक्ष्मीदर्शनाने कामे करून घेतली जातात.या मंडळींवर वरिष्ठांचे अजिबात नियंत्रण नाही.‘मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधाणार’ असा प्रश्न नागरिकांना पडला असून अर्थपुर्ण प्रक्रियेतुन हात चांगलेच ओले होत असल्याने एजंटगिरी फोफावत चालली असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहेत.

           याबाबत विविध सामाजिक संघटनांकडून वरीष्ठांना निवेदन देऊन कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी येथील या समस्येविषयी काय भुमिका घेणार याकडे तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.( पुढील भागात वाचा दर पत्रक क्रमशः)