Ads
Ads

शिरूर तालुका राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने शालेय साहित्य वाटप व पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार दि.९ रोजी सामाजिक उपक्रमाचे आयोजन

शिरूर तालुका राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने शालेय साहित्य वाटप व पुरस्कार वितरण सोहळा 

शुक्रवार दि.९ रोजी सामाजिक उपक्रमाचे आयोजन 

शिरूर (प्रतिनिधी ) - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शिरूर तालुका शाखेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दि. ९  ऑक्टोबर रोजी शिरूर येथील विद्याधाम प्रशालेसमोर असलेल्या राजभोग बँक्वेट हॉलमध्ये आयोजित करण्यात आला असून समाजिक उपक्रम राबवण्याचे पत्रकार संघाचे हे १५ वे वर्षे आहे.

या कार्यक्रमास जागतिक उद्योगपती मा. श्री. प्रकाशभाऊ धारिवाल यांचे शुभहस्ते लाभणार असून, आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

कार्यक्रमास ज्येष्ठ सिनेअभिनेते सुनील गोडबोले, शिरूर नगराध्यक्षा  ऐश्वर्याताई पाचर्णे, माजी आमदार ॲड अशोकबापू पवार, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पंचायत समितीच्या सभापती  स्वातीताई विठ्ठल घावटे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र भोसले, पुणे जिल्हाध्यक्ष सितारामजी लांडगे, शिरूरचे उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती शिरूर तालुका सं.अध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिली.

   या उपक्रमातून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांना शैक्षणिक मदतीचा हात दिला जाणार आहे. तसेच सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, प्रशासन, कला व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी,सदस्य, नगरसेवक, नगरसेविका तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका अध्यक्ष पत्रकार अर्जुन बढे यांनी केले.यावेळी शहराध्यक्ष बबन वाघमारे, महिला शहराध्यक्ष अश्विनी सांगळे,तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब खपके,सचिन जाधव,उमेश कारखिले यांच्यासह संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.