Ads
Ads

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती योजनेसाठी आधार प्रमाणीकरण त्वरित करून घ्यावे – हरिश्चंद्र कांबळे, सहाय्यक निबंधक सहकार

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती योजनेसाठी आधार प्रमाणीकरण त्वरित करून घ्यावे – हरिश्चंद्र कांबळे, सहाय्यक निबंधक सहकार

शिरूर (भगवान श्रीमंदिलकर) - राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य असून, शिरूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही किंवा ॲग्रीस्टॅक तयार केलेले नाही, त्यांनी तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सहाय्यक निबंधक, सहकार, शिरूर हरिश्चंद्र कांबळे यांनी केले आहे.

        शिरूर तालुक्यात अद्याप ६४५ शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक तयार केलेले नसल्यामुळे त्यांचे आधार प्रमाणीकरण होऊ शकलेले नाही. तसेच ६१६ शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक उपलब्ध असूनही आधार प्रमाणीकरण बाकी आहे. या सर्व शेतकऱ्यांनी विलंब न करता संबंधित सहकारी संस्था, सेवा केंद्र किंवा शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर जाऊन आवश्यक Image प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याने शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया शेवटच्या क्षणापर्यंत न ठेवता त्वरित पूर्ण करावी असेही आवाहन हरिश्चंद्र कांबळे यांनी केले.

योजनेतील कोणताही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नये, यासाठी सहकार विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून, शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन शेवटी करण्यात आले आहे.

Image