शिरूरमध्ये 'आर्ट ऑफ लिव्हिंग'तर्फे आयोजित मोफत श्रावण मास विशेष सामूहिक रुद्रपूजा, ध्यान व सत्संगाचा लाभ घ्या : प्रशिक्षक अतुल शेलार
शिरूर (प्रतिनिधी) -
पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून 'आर्ट ऑफ लिव्हिंग' शिरूर शाखेच्या वतीने भव्य सामूहिक रुद्रपूजा, ध्यान व सत्संग या विशेष अध्यात्मिक कार्यक्रमाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. हा मंगलमय सोहळा बुधवार, दिनांक ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत बाबुराव नगर येथील 'ज्ञानगंगा विश्वविद्यालय' येथे संपन्न होणार असून, शिरूर शहर व परिसरातील सर्व भाविकांनी आणि नागरिकांनी सपरिवार व मित्रपरिवारासह यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक अतुल शेलार यांनी केले आहे.
वैदिक संस्कृतीत प्राचीन काळापासून रुद्रपूजेला अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे. रुद्रपूजेच्या दिव्य मंत्रोच्चार व स्पंदनांमुळे
व्यक्तीच्या मनावर तसेच संपूर्ण पर्यावरणावर अत्यंत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यामुळे व्यक्ती आणि सभोवतालच्या वातावरणात प्राणऊर्जा व सत्वगुणांची वृद्धी होते. तसेच पितृदोष, ग्रहदोष, वास्तुदोष व संचित कर्मदोषांचे निवारण होऊन मानवी जीवन शांती, समाधान आणि तृप्तीने परिपूर्ण होते. रुद्रपूजेच्या प्रभावाने भगवान शिव, भगवान विष्णू, विघ्नहर्ता गणपती, महादेवी (शक्ती, महालक्ष्मी, महासरस्वती), भगवान सूर्य आणि साक्षात गुरूतत्व अशा षट्शक्तींची अथांग कृपा प्राप्त होते, अशी माहिती यावेळी आयोजकांकडून देण्यात आली.
हा संपूर्ण कार्यक्रम सर्वांसाठी पूर्णतः मोफत असून यामध्ये सामूहिक रुद्रपूजेसह ध्यान आणि सुश्राव्य सत्संगाची अनुभूती घेता येणार आहे. तरी शिरूर परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी, महिलांनी व युवकांनी उपस्थित राहून शिवमय वातावरणाचा व रुद्रपूजेच्या दिव्य ऊर्जेचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने
करण्यात आले आहे. कार्यक्रमात पूजा संकल्प सोडण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी ८४८४९४००२२, ९९२३१५४०४०, ९८२२११२१२७ किंवा ९८२३८४५३१७ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही शेवटी सांगण्यात आले.


