प्रतिनिधी प्रमोद मुरेकर: आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे (मो. 8888946254) यांनी सांगितले की, कोणत्याच राजकीय पक्षाने धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवलेला नाही. प्रमोद मुरेकर यांनी त्यांच्याशी मोबाईलवर संवाद साधला असता, देवरे यांनी स्पष्ट केले की त्यांचा समाज सध्या कोणत्याही राजकीय पक्षाला पाठींबा देणार नाही.
अभिलाल दादा देवरे म्हणाले की, "आजपर्यंत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, वंचित आघाडी, रासपा या कोणत्याही पक्षाने धनगर समाजाचे प्रलंबित मुद्दे सोडवलेले नाहीत. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, शिक्षक भरती, शेतकरी आणि शेतमजूर यांचे प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत." त्यांनी असेही सांगितले की, त्यांच्या आदर्श मल्हार सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर गोरगरीब जनतेला मोफत आरोग्यसेवा, रक्तदान, आणि अन्य सामाजिक उपक्रमांद्वारे मदत केली जात आहे.
अध्यक्ष अभिलाल देवरे म्हणाले, "माझ्या सोबत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जाती-धर्मांचे लोक एकत्र आहेत. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही आणि जो पक्ष धनगर समाजाचे प्रश्न सोडवेल, उमेदवारी देईल, त्यांनाच आम्ही राजकीय मदत करू." तसेच, धनगर समाजाच्या नावावर कोणत्याही पक्षासाठी दलाली करणाऱ्यांनी समाजाचे नुकसान करू नये, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
देवरे यांनी असेही नमूद केले की, "जर धनगर समाजासाठी योग्य उमेदवार मिळाला नाही, तर महाराष्ट्रभर अपक्ष उमेदवारी करणार. जिथे आमचा उमेदवार नाही, तिथे गरीब व योग्य उमेदवाराला समर्थन देऊ."


