व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या टोळीचा २४ तासांत पर्दाफाश; पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-१ ची दमदार कामगिरी
पुणे, दि. १७ जुलै (भगवान श्रीमंदिलकर ) -
पुणे शहरातील कोथरूड परिसरात मोबाईल व्यावसायिकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-१ ने अवघ्या २४ तासांत छडा लावत मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणात मुख्य आरोपींसह एकूण आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यामध्ये दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचाही समावेश आहे
पोलिसांनी तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि जलद कारवाईच्या आधारे आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली. प्राथमिक तपासात जुन्या वादातून हल्ल्याचा कट रचल्याची बाब समोर आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-१ ने केली असून,
संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे गंभीर गुन्ह्याचा जलद उलगडा करण्यात यश आले.


