आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथावाचक पंडित आचार्य प्रदीपजी मिश्रा (सीहोरवाले) यांचे शिरूर शहरात जंगी स्वागत
शिरूर, (प्रतिनिधी ) -आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथावाचक पंडितआचार्य प्रदीपजी मिश्रा (सीहोरवाले) यांचे शिरूर शहरात उद्योजक प्रकाश शेठ धारिवाल यांनी जंगी स्वागत केले. संपूर्ण शहर 'हर हर महादेव'च्या घोषात शिवमय झाले होते.
रामलिंग महाराज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या भूमीत पंडित आचार्य प्रदीपजी मिश्रा (सीहोरवाले) जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी शिरूर नगरी हि अक्षरशः भक्तिमय झाली होती.शिव महापुराण कथा निमित्त आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथावाचक पंडित आचार्य प्रदीपजी मिश्रा (सीहोरवाले) शहरात आगमन झाले.
पी. आर. धारीवाल फाऊंडेशन, शिरूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याच्या निमित्त सायं ५ वाजता पाबळ फाटा येथून ते धारिवाल यांच्या आशीर्वाद निवास' पर्यंत भव्य मिरवणुक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, 'हर हर
महादेव', ॐ नमः शिवाय च्या जय घोष्यात भव्य अशी मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून प्रकाशभाऊ धारीवाल यांच्या 'आशीर्वाद निवास' (बसस्थानकासमोर) येथे पोहोचली.
यावेळी महिलांचा उत्साह मोठा दिसून आला.महिलांनी मंगल कलश डोक्यावर घेऊन मिरवणुकीत मोठ्याप्रमाणात सहभाग नोंदविला.
जळगाव येथील प्रसिद्ध वाद्यवृंद आणि मर्दानी बाज असलेले एकलव्य ढोल-ताशा पथक यामुळे वातावरण आणखी भारावून गेले. प्रत्येक चौकात भाविकांनी फुलांचा वर्षाव करत मिश्रा यांचे स्वागत केले.
पंडित मिश्रा ज्या वाहनात विराजमान होते, ते वाहन 'ॐ' आणि 'त्रिशूल' या आकर्षक फूल सजावटीने नटले होते. पाबळ फाटा येथे प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल, त्यांच्या ज्येष्ठ भगिनी, पत्नी दिनाभाभी धारिवाल, उद्योगपती आदित्य धारिवाल, जान्हवी धारिवाल तसेच नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी त्यांचे स्वागत केले.
मिरवणूक धारीवाल यांच्या बंगल्यावर पोहोचली. तेथे क्रेनच्या साहाय्याने भव्य पुष्पहार
घालून मिश्रा यांचा सत्कार करण्यात आला. मिश्रा यांनी उद्योजक प्रकाश शेठ धारीवाल यांना शाल घालून त्यांचा सत्कार केला.
यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्त, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, शिरूर शहरातील आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक कार्यकर्ते पी. आर. धारीवाल फाऊंडेशन, शिरूर चे कार्यकर्ते मोठया संख्येने उवस्थित होते.


