Ads
Ads

अरे ढाण्या थोडक्यात वाचलास... मी सभा घेतली असती तर काय झालं असतं तुझं?

जागृत शोध(प्रतिनिधी):- अरे ढाण्या थोडक्यात वाचला, मी सभा घेतली असती तर तुझं काय झालं असतं? असा मिश्कील टोला राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुतण्या आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना लगावला.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला चांगले यश मिळाले. विधानसभा निकालानंतर आज पहिल्यांदाच कराड येथील प्रितीसंगमावर अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली. अजित पवार समोर येताच रोहित पवार यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. यावेळी अजित पवार म्हणाले की, "अभिनंदन..., बच गया... दर्शन घे दर्शन काकाचं... अरे ढाण्या थोडक्यात वाचला... मी सभा घेतली असती तर तुझं काय झालं असतं?"

             राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ गटनेतेपदी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार तर प्रतोदपदी अनिल पाटील यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी रविवारी झालेल्या आमदारांच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.