Ads
Ads

(FDA) आयुक्त तुकाराम मुंढे 'ॲक्शन प्लॅन' कडक, नियम मोडणाऱ्या हॉटेल्सवर कारवाई होणार धडक;

नाही चालणार अस्वच्छतेचा धंदा, आरोग्याशी खेळल्यास थेट कारवाईचा बडगा!

​जागृत शोध वृत्तलेख

पुणे ( भगवान श्रीमंदिलकर ) -

​हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या चमचमीत पदार्थांवर ताव मारणाऱ्या खवय्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या हॉटेल चालकांची अबालवृद्धातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच, आता नियम धाब्यावर बसवणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे हॉटेल व्यवसायात मोठी खळबळ उडाली आहे. "स्वच्छता आणि अन्नाचा दर्जा राखता येत नसेल, तर व्यवसाय बंद करा," असा सज्जड दम (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हॉटेल आणि महामार्गावरील ढाब्यांसाठी अत्यंत कडक नियमावली जाहीर केली आहे. या धडक कारवाईमुळे अनेक नामवंत हॉटेल्सचे 'किचन' रडारवर आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट सील ठोकण्याची कारवाई सुरू आहे.

              ​याच Image धडक कारवाई मुळे आणि नव्या नियमावलीच्या अनुषंगाने घेतलेला हा सविस्तर आढावा:

​१. किचनमधील अस्वच्छता रोखण्यासाठी 'पारदर्शकतेचा' उतारा

​हॉटेलच्या चकचकीत डायनिंग हॉलच्या मागे असणाऱ्या किचनमध्ये अनेकदा प्रचंड अस्वच्छता, झुरळे आणि उंदरांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. ग्राहकांना अंधारात ठेवून चालणाऱ्या या प्रकाराला आयुक्त मुंढे यांनी चाप लावला आहे.

​CCTV अनिवार्य: आता प्रत्येक हॉटेलला त्यांच्या स्वयंपाकघरात (किचन) सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. याचे थेट प्रक्षेपण ग्राहकांना बसण्याच्या ठिकाणी स्क्रीनवर दाखवावे लागणार आहे.

​काचेच्या भिंती: ग्राहकांना आपले अन्न कसे तयार होते आहे हे प्रत्यक्ष पाहता यावे, यासाठी किचनला पारदर्शक काचा बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे पडद्यामागे चालणाऱ्या अस्वच्छतेला पूर्णपणे आळा बसेल.

​२. पिण्याचे शुद्ध पाणी मोफत देणे बंधनकारक; 'बिसलेरी'ची सक्ती खपवून घेणार नाही!

​अनेक हॉटेल्स आणि ढाब्यांवर ग्राहकांना Image पिण्याचे साधे पाणी न देता, थेट सीलबंद बाटली (उदा. बिसलेरी किंवा अन्य ब्रँड) विकत घेण्याची सक्ती केली जाते. या मनमानी कारभारावरही एफडीएने आता कडक भूमिका घेतली आहे.

​शुद्ध पाण्याची मोफत सोय: प्रत्येक हॉटेलने ग्राहकांना पिण्यासाठी 'RO' शुद्धीकृत आणि सुरक्षित पाणी विनामूल्य (Free) उपलब्ध करून देणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे.

​बाटलीबंद पाण्याची सक्ती नको: जर ग्राहकाने साधे पिण्याचे पाणी मागितले, तर त्याला ते उपलब्ध करून द्यावेच लागेल. 'आमच्याकडे फक्त मिनरल वॉटरची बाटली मिळते' असे सांगून पाण्याची बाटली विकत घेण्याची सक्ती केल्यास संबंधित हॉटेलवर थेट कारवाई केली जाईल.

​MRP पेक्षा जास्त दर आकारल्यास कारवाई: बाटलीबंद पाणी ग्राहकाला हवे असल्यास, त्यावर छापील किमतीपेक्षा (MRP) जास्त पैसे आकारल्यास कडक दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.

​३. शिळे अन्न अन् विषारी तेलाचा पुनर्वापर: थेट गुन्हे दाखल!

​FDA च्या पथकांनी टाकलेल्या धाडींमध्ये धक्कादायक बाबी समोर आले आहेत. अनेक हॉटेल्समध्ये आठवडाभराचे शिळे अन्न, बुरशी आलेले पनीर आणि सडलेला भाजीपाला फ्रीजमध्ये साठवून ठेवल्याचे उघड झाले आहे.

​कॅन्सरला आमंत्रण देणाऱ्या तेलावर बंदी: हॉटेल्समध्ये एकाच तेलात वारंवार पदार्थ तळले जातात. नव्या नियमानुसार, कोणतेही खाद्यतेल ३ पेक्षा जास्त वेळा वापरता येणार नाही. तेलाचा दर्जा तपासण्यासाठी विशेष उपकरणे वापरली जात असून, निकष ओलांडल्यास अन्न साठा जागेवरच नष्ट करून गुन्हे दाखल केले जात आहेत.

​दुग्धजन्य पदार्थांची कडक तपासणी: खवा, मावा, पनीर आणि मसाले हे केवळ अधिकृत परवानाधारकांकडूनच खरेदी करावे लागणार असून, त्याची पक्की बिले सादर करणे बंधनकारक आहे.

​४. कर्मचाऱ्यांचे 'मेडिकल सर्टिफिकेट' सक्तीचे

​हॉटेलमध्ये अन्न शिजवणारे आणि वाढणारे कर्मचारी निरोगी असणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकदा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका असतो.

​आता हॉटेलमधील प्रत्येक शेफ आणि वेटरची वार्षिक वैद्यकीय तपासणी (Medical Fitness) सक्तीची करण्यात आली आहे.

​कामाच्या ठिकाणी डोक्यावर कॅप, हातामध्ये ग्लोव्हज आणि ॲप्रन वापरणे अनिवार्य आहे. यामध्ये हलगर्जीपणा आढळल्यास थेट मालकावर दंडात्मक कारवाई होत आहे.

​५. केवळ दंड नाही, आता थेट परवाना रद्द!

​पूर्वी किरकोळ दंड भरून सुटका करून घेणारे हॉटेल व्यावसायिक आता धास्तावले आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक कार्यपद्धतीमुळे आता केवळ आर्थिक दंड करून प्रशासन थांबत नाही, तर थेट FSSAI परवाना निलंबित करणे किंवा हॉटेल सील करणे यासारखी कठोर पावले उचलली जात आहेत. महामार्गावरील ढाब्यांवर रात्रीच्या वेळी अचानक धाडी टाकून तपासणीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

​हॉटेलमध्ये लुटमार किंवा अस्वच्छता आढळल्यास येथे तक्रार करा:

​प्रशासनाने ग्राहकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी विशेष तक्रार निवारण कक्ष सुरू केला आहे. जर आपल्याला कोणत्याही हॉटेल किंवा ढाब्यावर अस्वच्छता, शिळे अन्न, पाण्याची सक्ती किंवा छापील किमतीपेक्षा जास्त दर आकारल्याचे आढळल्यास तात्काळ खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:

​FDA राष्ट्रीय टोल-फ्री क्रमांक: 1800-11-2100 (FSSAI)

​राज्य अन्न व औषध प्रशासन टोल-फ्री क्रमांक: 1800-222-365

​थेट व्हॉट्सॲप तक्रार क्रमांक (पुणे व महाराष्ट्र विभाग): 98692 23365 / 86575 39365 (अस्वच्छ किचनचे फोटो किंवा बिलाचे फोटो थेट पाठवण्यासाठी)

​ऑनलाइन तक्रार पोर्टल: www.fdamaharashtra.gov.in किंवा FSSAI च्या 'Food Safety Connect' ॲपवर.

​'जागृत शोध चे आवाहन: 

ग्राहक राजा हो, जागरूक व्हा आता!

​प्रशासनाची कारवाई आपल्या आरोग्यासाठीच आहे. जर कोणत्याही हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर गैरप्रकार आढळल्यास, पिण्याचे साधे पाणी देण्यास नकार दिल्यास किंवा बाटली घेण्याची सक्ती केल्यास, जागरूक नागरिक म्हणून वरील टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवून या मोहिमेत सहभागी व्हा.