Ads
Ads

जिल्ह्यात ओबीसीची फरपट ...! सुदर्शन बोराडे उठ ओबीसी जागा हो संघर्षाचा धागा हो...!!

जिल्ह्यात ओबीसीची फरपट ...! सुदर्शन बोराडे 
उठ ओबीसी जागा हो संघर्षाचा धागा हो...!!  

 

लातूर (प्रतिनिधी प्रमोद मुरेकर):-लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आसलेल्या ओबीसी समाजा समोर हजारो समस्या निर्माण झाले आहेत. हा समुदाय मोठा वर्ग आहे परंतु धूरंधर राजकीय नेते या समाजातील लोकांच्या ठिक- या-ठिक-या केल्याने हा समाज सामाजिक, शैक्षणिक, अर्थिक, सांस्कृतिक, आशा सर्व क्षेत्रात वंचितच राहतांना दिसत आहे या समाजातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आजूनतरी ओबीसी नेतृत्व खंबीर तयार झाले नाही याचाच प्रत्यय लातूरमध्ये सारथीला जागा मिळते.. पण ओबीसी विद्यार्थ्यांना वस्तीग्रह साठी जागा मिळत नाही हा ओबीसीवर मोठा अन्याय नाही का.? राजकीय पुढा-यांना निवडणुकीसाठी ओबीसीचे मते लागतात पण त्यांच्या विकासासाठी कोणीही काही करीत नाहीत.. पण हेच ओबीसीवर :
अन्याय दिवसेंदिवस वाढतच आहे.लातूरमध्ये ८५ टक्के हा ओबीसी असून मतासाठी ओबीसीचा फक्त वापर केला जातोय मग मूग गिळून बसलेले लोकप्रतिनिधी गप्प का आहेत.? स्वतः ला ओबीसी नेते समजले जाणारे नेते कोणाच्या इशा- याची वाट पहात आहेत ते देवच जाणो.. येणाऱ्या काळात गोरगरीब ओबीसी समाजातील माणसांना माणसाप्रमाणे वागणूक मिळावी व शास्वत विकास प्रवाहात आणण्यासाठी ओबीसी समाजातील जाणकारांनी एकत्र येऊन ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आसल्याचे आवाहन सुदर्शन बोराडे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ यांनी आमच्या प्रतिनिधी कडे दुःख व्यक्त करीत आपल्या समाजाला अर्त हाक दिली.