Ads
Ads

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन; महाराष्ट्राच्या सामाजिक-वैचारिक चळवळीवर शोककळा

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन; महाराष्ट्राच्या सामाजिक-वैचारिक चळवळीवर शोककळा

पुणे, प्रतिनिधी : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, माजी आमदार, प्रख्यात लेखक आणि युवकांच्या वैचारिक चळवळीला नवी दिशा देणाऱ्या 'युवक क्रांती दल' (युक्रांद) या संघटनेचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी (वय ८५) यांचे शनिवारी पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून पुरोगामी चळवळीने एक ज्येष्ठ मार्गदर्शक गमावला आहे.

डॉ. कुमार सप्तर्षी यांनी आयुष्यभर समाजवाद, गांधीवाद, लोकशाही मूल्ये, सामाजिक न्याय आणि भ्रष्टाचाराविरोधातील लढा यासाठी सातत्याने कार्य केले. युवकांमध्ये वैचारिक जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी युवक क्रांती दलाची स्थापना करून हजारो तरुणांना सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी करून घेतले.

माजी आमदार, लेखक आणि प्रभावी वक्ते म्हणून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर निर्भीड भूमिका घेत जनजागृती केली. त्यांच्या विचारांचा प्रभाव अनेक पिढ्यांवर पडला असून ते युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ओळखले जात होते.

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाबद्दल विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला असून त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील, अशा भावना व्यक्त होत आहेत.

जागृत शोध, राजर्षी शाहू प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, दक्ष मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली! डॉ. कुमार सप्तर्षी यांना विनम्र अभिवादन.