कृषी दिनी जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने नितीन थोरात यांचा सन्मान
शिरूर (प्रतिनिधी ) - जिल्हा परिषद पुणे, कृषी विभाग ( महाराष्ट्र शासन ), आत्मा पुणे आणि पंचायत समिती हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. कै. वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री वीरधवल जगदाळे अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे व प्रमुख उपस्थिती सभापती महिला व बालकल्याण च्या माननीय श्रीमती. अंकिता पाटील त्याचबरोबर सभापती कृषी पशुसंवर्धन व दुग्धविकास माननीय श्री. अमोल दादा नलावडे तसेच श्रीमती दिपाली होलावळे. श्री. विवेक दादा वळसे पाटील.जिल्हा परिषद सदस्य श्रीमती. दिपाली गव्हाणे तसेच जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी श्री.गजानन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. शरदचंद्रजी पवार सभागृह, जिल्हा
परिषद,पुणे येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शासकीय कृषी सन्मानाने सन्मानित असलेल्या शेतकऱ्यांचा गौरव या निमित्ताने करण्यात आला यावेळी शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावचे सुपुत्र वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी नितीन अर्जुन थोरात यांचाही सन्मान सभापती अमोल दादा नलावडे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमासाठी शिरूर,दौंड, बारामती, इंदापूर हवेली, मुळशी, मावळ,खेड,जुन्नर भोर,वेल्हे, आंबेगाव,पुरंदर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून शेतकरी,महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. शेतकऱ्याच्या श्रमाचा हा गौरव जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी करण्याचा मानस असल्याचे यावेळी सांगितले.


