कदमवाक वस्ती येथे जनसुरक्षा कार्यक्रमाचे आयोजन
पुणे (प्रतिनिधी ) - ग्रामपंचायत स्तरावरील जनसुरक्षा मोहिमेअंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र आणि ग्रामपंचायत कदमवाक वस्ती, लोणी काळभोर यांच्या संयुक्त विद्यमाने 24 जुलै 2025 रोजी दु. 12 वा. पालखी तलाव, कदमवाक वस्ती येथे जनसुरक्षा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे प्रादेशिक सुमन रे आणि बँक ऑफ महाराष्ट्र चे महाप्रबंधक मनोज करे हे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात नागरिकांसाठी जन धन खाते उघडणे, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना,अटल पेन्शन योजना, खात्यांचे Re-KYC, सायबर फसवणूक विषयक जनजागृती, वारस नोंदणी आदी सेवाबाबत आणि जनजागृती करण्यात येणार आहे.
अधिकाधिक नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय व
जिल्हा अग्रणी बँक यांच्या वतीने करण्यात आले आहे.


