Ads
Ads

"मारणारा निघाला भलता, सुपारीबाजांचा डाव उलटला; रांजणगाव गोळीबार प्रकरणात आरोपींचा पर्दाफाश झाला!" रांजणगाव पोलिस आणि Lcb च्या पथकाने आरोपींची मुसक्या आवळल्या!


 

"मारणारा निघाला भलता, सुपारीबाजांचा डाव उलटला; रांजणगाव गोळीबार प्रकरणात आरोपींचा पर्दाफाश झाला!"

रांजणगाव पोलिस आणि Lcb च्या पथकाने आरोपींची मुसक्या आवळल्या!

शिरूर (प्रतिनिधी):

रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारेगाव येथे एका पाण्याच्या प्लांटमध्ये काम करणाऱ्या निष्पाप कामगाराची डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली होती। जागेच्या वादातून घरमालकाला मारण्यासाठी दिलेल्या सुपारीतून, मारेकऱ्यांनी गैरसमजातून निष्पाप कामगाराचा बळी घेतल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व रांजणगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मुख्य सूत्रधारासह पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत।

नेमकी घटना काय?

कारेगाव (साईनगर) येथील विकास नवले यांच्या इमारतीजवळ असलेल्या 'समु एंटरप्रायजेस ॲक्वा रिच' या पाण्याच्या प्लांटमध्ये काम करणारे हमजा उस्मान शेख (वय ३९, रा. मूळ धानोरा काळे, जि. परभणी, सध्या रा. कारेगाव) हे नेहमीप्रमाणे कामावर गेले असताना, अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या डोक्यात गोळी झाडून त्यांचा जागीच खून केला होता। या प्रकरणी त्यांच्या पत्नी अबिताबी हमजा शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता।

सुपारीचा कट आणि गैरसमजातून कामगाराचा बळी:

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी समांतर तपास सुरू केला। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांना ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच धक्कादायक कट समोर आला। आरोपी सार्थक संदेश कोहकडे याचा शेजारी राहणारे विकास नवले यांच्याशी जागेचा वाद सुरू होता। याच वादातून कोहकडे याने नवले यांना संपवण्यासाठी तुषार तोडकर याला सुपारी दिली। तोडकरने ही सुपारी पिंपरी-चिंचवडमधील सराईत गुन्हेगार संतोष मांढरे याला दिली।

संतोष मांढरे आणि त्याच्या साथीदारांनी पा पाण्याच्या प्लांटमध्ये जाऊन विकास नवले समजून तेथे काम करत असलेल्या हमजा शेख यांच्या डोक्यात गोळी झाडली व त्यांचा खून केला। म्हणजेच, टार्गेट भलतेच असताना गैरसमजातून निष्पाप कामगाराचा बळी गेला।

आरोपी गजाआड, एकाचा शोध सुरू:

पोलिसांनी या प्रकरणात सार्थक संदेश कोहकडे (वय २४, रा. कारेगाव), तुषार अजय तोडकर (वय २६, रा. पेठ, आंबेगाव), संतोष मधुकर मांढरे (वय ३७, रा. मांढरेवस्ती, खेड), विठ्ठल नवनाथ पिकळे (वय २७, रा. कोरेगाव, खेड) आणि योगेश विलास इडोळे (वय २८, रा. शुक्रवार पेठ, वाशीम) या पाच जणांना अटक केली आहे। तर यातील फरार आरोपी पवन सुरेश हुंडारे व पृथ्वी ऊर्फ भैय्या दत्तू जाधव यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत।

पोलिस पथकाची यशस्वी कारवाई:

सदरची उल्लेखनीय कामगिरी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भासले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम व त्यांच्या पथकाने केली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमार कदम करत आहेत।

​"पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीत गुन्हेगारी आणि टोळीयुद्धासारख्या प्रवृत्तींना थारा दिला जाणार नाही. कारेगाव येथील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या काही वेळातच या सुपारी हत्येच्या कटाचा पर्दाफाश केला. एका निष्पाप कामगाराचा बळी घेणाऱ्या कोणत्याही आरोपीची गय केली जाणार नाही. यातील फरार आरोपींनाही लवकरच अटक करून सर्व आरोपींविरुद्ध न्यायालयात भक्कम पुरावे सादर केले जातील, जेणेकरून त्यांना कठोर शिक्षा होईल."

​— संदीप सिंह गिल्ल

(पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण)

​"शिरूर उपविभागात शांतता व सुव्यवस्था राखणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. कारेगाव येथील गोळीबाराच्या घटनेनंतर तात्काळ विविध तपास पथके रवाना करून आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होतो. पोलिसांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने आणि वेगाने काम करत गुन्ह्याचा कट उघडकीस आणला आहे. जागेच्या वादातून किंवा कोणत्याही कारणाने कायदा हातात घेणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही. या गुन्ह्यातील फरार आरोपींनाही लवकरच अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल."

​— रवींद्र भासले

(उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर विभाग)

​"घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांत या गुन्ह्याचा छडा लावला आहे. जागेच्या वादातून सुपारी देऊन करण्यात आलेल्या या कटात एका निष्पाप कामगाराचा बळी गेला. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह पाच आरोपींना बेड्या ठोकल्या असून, फरार आरोपींचा कसून शोध सुरू आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कायद्याचा धाक दाखवला जाईल आणि कोणाचीही गय केली जाणार नाही."

​— प्रमोद क्षीरसागर

(पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण)

​"कारेगाव येथील गोळीबाराची घटना अत्यंत गंभीर होती. स्थानिक गुन्हे शाखा आणि रांजणगाव पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे समांतर तपास करत आरोपींचा कट उधळून लावला आहे. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित फरार आरोपींनाही लवकरच जेरबंद केले जाईल. अशा गुन्हेगारी कृत्यांना रांजणगाव हद्दीत खपवून घेतले जाणार नसून आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल."

​— कुमार कदम

(पोलीस निरीक्षक, रांजणगाव पोलीस ठाणे)