Ads
Ads

माऊली पर्व झाले सुरु! ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ!

शिरूर ( भगवान श्रीमंदिलकर )

महाराष्ट्र राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिरूर-हवेली विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेले उमेदवार ज्ञानेश्वर आबा कटके यांनी रविवारी (दि. ८ डिसेंबर) मुंबई विधानसभा येथे विधानसभा सदस्यची शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित आम दारांना विधानसभा सदस्याची शपथ देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील आमदारांनी शपथ घेतली. यामध्ये शिरूर-हवेली विधानसभा निवडणुकीत सुमारे ७५ हजार मताधिक्याने विजय झालेले माऊली आबा कटके यांनी देखील शपथ घेतली. निवडणुकीमध्ये वाघोलीकरांनी कटके यांना मोलाची साथ दिली असून त्यांच्या विजयात वाघोली व परिसरातील गावांच्या मतदारांचा तरुणांचा मोठा वाटा राहिला आहे. शपथविधीनंतर कटके यांच्या माध्यमातून वाघोली तसेच शिरूर हवेलीतील गावांना आवश्यक सहकार्य होईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. प्रथमच विधिमंडळ विशेष Image अधिवेशनासाठी उपस्थित राहिलेले आमदार कटके यांनी विधानसभेत प्रवेश करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदन करून तसेच विधानसभेच्या पायऱ्यावर डोके ठेवून नंतर विधान भवन प्रवेश केला.

आमदार म्हणून शपथ घेतल्याचा क्षण

हा केवळ माझ्यासाठीच नव्हे तर माझ्या सर्व जनतेसाठी अभिमानाचा आहे. हा विश्वास तुमच्या आशीर्वादामुळे आणि साथीदार मित्रांच्या पाठिंबामुळेच शक्य झाल्याचे झाला आहे. ही जबाबदारी म्हणजे जनतेच्या सेवेसाठी एक संधी आहे, ज्याला मी प्रामाणिकपणे न्याय देईल अशी खात्री देतो. तुमच्या हक्कासाठी प्रगतीसाठी आणि सर्वसमावेश विकासासाठी अविरत प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वर कटके यांनी शपथविधीनंतर दिली.

Image