Ads
Ads

पत्त्यांचा डाव रंगला,शिक्रापूर पोलिसांचा छापा पडला; ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त झाला!”

“पत्त्यांचा डाव रंगला,शिक्रापूर पोलिसांचा छापा पडला; ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त झाला!” 

 शिक्रापूर ( प्रतिनिधी ) - कोरेगाव भीमा ता. शिरूर येथील पिंपळे जगताप रस्त्यालगत पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून कैषय ज्ञानदेव माने, चिवाजी गोरख मोरे, प्रतम मानराव खलते, प्रवीण गौतम कांबळे, जगराम रघुवीरसिंग तोनर व प्रशांत सूर्यप्रकाश पांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

                         कोरेगाव भीमा ता. शिरूर येथील पिंपळे जगताप रस्त्यालगत असलेल्या एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला काही इसम पत्र्याच्या आडोशाला बसून पत्त्यांच्या सहाय्याने जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक जीनेश कोळी, पोलीस हवलदार श्रावण गुपचे, पोलीस शिपाई भारत भोसले, नागेश वाघमारे, राम जाधव यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्यांना काहीही ईसम गोलाकार बसून त्यांच्या सहाय्याने जुगार खेळत असल्याचे दिसून आले, दरम्यान पोलिसांनी जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा बत्तीस हजार रुपयांचा ऐवज जप्त करत जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले, याबाबत पोलीस शिपाई नागेश कचरू वाघमारे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी कैषय ज्ञानदेव माने वय ४७ वर्षे व चिवाजी गोरख मोरे वय ३६ वर्षे दोघे रा. पेरणे फाटा ता. हवेली जि. पुणे, प्रतम मानराव खलते वय २८ वर्षे, प्रवीण गौतम कांबळे वय २८ वर्षे, जगराम रघुवीरसिंग तोनर वय २९ वर्षे व प्रशांत सूर्यप्रकाश पांडे वय ३० वर्षे चौघे रा. कोरेगाव ता. शिरूर जि. पुणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार श्रावण गुपचे हे करत आहे.

स्वतंत्र चौकट १ -

कोरेगाव भीमा स्वतंत्र पोलीस चौकी असून काही पोलीस कर्मचारी नियमित हजर असतात मात्र असे असताना देखील पोलीस चौकीच्या आजूबाजूला वारंवार जुगार व पत्त्यांचे क्लब सुरू असल्याने छापे पडून गुन्हे गुन्हे दाखल होत असताना यामध्ये कोणत्यातरी बॉस नामक पोलीस कर्मचाऱ्याचे पाठबळ असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू असून हा बॉस कोण अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.