Ads
Ads

रांजणगाव पोलीसांची दबंग कामगिरी 72 तासात गुन्हा केला उघडकिस

रांजणगाव पोलीसांची दबंग कामगिरी 72 तासात गुन्हा केला उघडकिस 

शिरूर (प्रतिनिधी ) - रांजणगाव पोलीसांनी दबंग कामगिरी करत  अवघ्या 72 तासात गुन्हा उघडकिस आणण्याची कामगिरी केली. रांजणगाव एमआयडीसी मधिल चमाडीया गोडाउन मधुन बिस्किट, साबण, सिगारेट व ईतर वस्तूची चोरीचा गुन्हा, रांजणगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.

               याबाबत सविस्तर हकीगत अशी कि,दिनांक 17/12/2025 रोजी पहाटे 06-40 वा सुमारास अज्ञात चोरट्याने माल भरुन ठेवलेल्या पिकअप चालु करुन गेटवर चलनाची नोंद करून माल भरलेला इलेक्ट्रीक पिकअप सह 65,98,897/- रु किमतीची सिगारेट व इतर मालाची चोरी गेला होता.72 तासात गुन्हा उघडकिस आणून चोरीस गेलेला माल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 68 लाख किमतिचा मुद्देमाल केला जप्त.सदर बाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिपक देवदास शिंदे रा. लोणीकंद, मगरवस्ती, खेडेकर यांचे खोलीत ता हवेली जि पुणे यांनी फिर्यादी दिली होती.त्या वरुन मु र नं 478/2025 भा न्या संहिता कायदा कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

                सदर गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात साहित्य चोरी झालेले असल्याने तसेच औद्यागिक क्षेत्रात अशा प्रकारच्या मोठ्या चोरीच्या घटणा देशाच्या आर्थिक प्रगतीस खुप धोकादायक आहेत. परिणामी पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल्ल पुणे ग्रामीण यांनी विशेष लक्ष घालुन गुन्हा उघडकिस आणण्याचे दृष्टिने वेगवेगळ्या पथक नेमुण योग्य त्या सुचना दिल्या, त्यानुसार पोलीस निरिक्षक महादेव वाघमोडे यांनी राजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील तपास पथकातिल पोलिस उप निरीक्षक अविनाश थोरात, सहा फौजदार दत्तात्रय शिंदे, पो कॉ उमेश कुतवळ, पो काँ योगेश गुंड, पो काँ किशोर शिवणकर यांना योग्य त्या सुचना दिल्या होत्या.

                 तपास चालु असताना चोरट्यांनी चोरी केलेली मुव्हिंग लॉजिस्टिकची पिकअप ही चमाडीया गोडाउन पासुन काही अंतरावर सोडुन त्यातुन फक्त 54,53,000/- रु किमतीची सिगारेट घेउन गेलेचे निष्पन्न झाले, सदर चोरी करताना आणखी एका वाहनाचा उपयोग केल्याचे तपासात रांजणगाव पोलीसांना निष्पन्न झाले, त्यानुसार रोडवरिल सुमारे शंभर पेक्षा जास्त सीसीटिव्ही तपासले. तपास सुरु असताना पोलीस अंमलदार उमेश कुतवळ हे वाघोली परिसरात संशयित वाहणाचा शोध घेत असताना त्यांना सदरचे वाहन हे कावेरी हॉटेल वाघोली येथे डिलिव्हरी करत असताना मिळुन आले, त्यानुसार सदर वाहनाचे मालक व सुपरवायझर, चालक यांचे कडे कौशल्य पुर्वक तपास केला असता सुपरक्याझर प्रथमेश चव्हाण याने आरोपी  दिपक ज्ञानेश्वर ढेरंगे व अल्ताफ आयुब मुल्ला यांना सदर वाहन हे चोरी करणे करीता दिल्याची कबुली दिली, त्यावरून आरोपी  ।) प्रथमेश ज्ञानेश्वर चव्हाण रा वाघोली ता हवेली जि पुणे यास अटक करण्यात आली. तपासात आरोपी कडुन चोरीस गेलेला मुद्देमाल त्याचप्रमाणे गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकुण 68,00,000/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात रांजणगाव एमआयडीस पोलीस स्टेशन कडील तपास पथकास यश आलेले आहे, इतर दोन आरोपीचा शोध सुरु आहे. यातील दिपक ज्ञानेश्वर ढेरंगे हा पोलीस अभिलेखा वरील आरोपी असुन त्यावे वर शिक्रापुर पोलीस स्टेशन, सिंहगडरोड, लोणीदंक पोलीस स्टेशन येथे चोरीचे एकुण 08 गुन्हे दाखल असल्याची माहीती प्राप्त झाली आहे.

       सदरची कामगिरी ही  पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल्ल,रमेश चोपडे अप्पर पोलीस अधिक्षक पुणे विभाग, प्रशांत ढोले उपविभागिय पोलीस अधिकारी शिरूर विभाग शिरूर, यांचे मार्गदर्शना खाली  महादेव वाघमोडे रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन,पोलिस उप निरीक्षक अविनाश थोरात, सहा फौजदार दत्तात्रय शिंदे, पो का उमेश कुतवळ, पो काँ योगेश गुंड, पो काँ किशोर शिवणकर पो हवा माणिक काळकुटे, पो काँ अमोल रासकर यांनी केली आहे सदर गुन्हायाचा तपास पोलिस उप निरीक्षक अविनाश थोरात हे करीत आहे.