Ads
Ads

राजर्षी शाहू आदर्श सरपंच पुरस्कार संजय भुजाडे यांना जाहीर

मानोरा(प्रतिनिधी) :- राजर्षी शाहू प्रतिष्ठान, दक्ष मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य जागृत शोध वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राजर्षी शाहू आदर्श सरपंच पुरस्कार  २०२५ ने शिवाजीनगर धामणी मानोरा येथील सहारा मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय चंदुभाऊ भुजाडे यांची निवड झाली आहे. तसे पत्र त्यांना चिंचवड पुणे येथून प्राप्त झाले आहे.

अध्यक्ष संजय भुजाडे हे मागील पंधरा वर्षांपासून कार्यरत आहेत

आगामी काळात अमृत महोत्सवानिमित्त राजर्षी शाहू पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार देशासाठी , राज्यासाठी, जिल्हा, तालुका व गावासाठी विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या पन्नास मान्यवरांना देवून सन्मानित करण्यात येणार आहे. सहारा मित्र मंडळाच्या वतीने बेघर, गोर गरीब, बेसहारा नागरीकांना आरोग्य विषयक सोयी सुविधा व अन्नदान या माध्यमातून अध्यक्ष संजय भुजाडे हे मागील पंधरा वर्षांपासून कार्य करत आहेत. त्यामुळे ते या पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. राजर्षी शाहू पुरस्कारासाठी भुजाडे यांची निवड मानोरा राजर्षी शाहू प्रतिष्ठान, दक्ष मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य जागृत शोध वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राजर्षी शाहू पुरस्कार २०२५ शिवाजी नगर धामणी मानोरा येथील सहारा मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय चंदुभाऊ भुजाडे यांची निवड झाली आहे. तसे पत्र त्यांना चिंचवड पुणे येथून प्राप्त झाले आहे.

आगामी काळात अमृत महोत्सवानिमित्त राजर्षी शाहू पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार देशासाठी , राज्यासाठी, जिल्हा, तालुका व गावासाठी विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या पन्नास मान्यवरांना देवून सन्मानित करण्यात येणार आहे. सहारा मित्र मंडळाच्यावतीने संपूर्ण तालुक्यात बेघर, गोर गरीब, बेसहारा नागरीकांना आरोग्य विषयक व अन्नदान या माध्यमातून मंडळाचे अध्यक्ष संजय भुजाडे हे मागील पंधरा वर्षांपासून कार्य करत आहेत. त्यामुळे ते या पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. त्यांना राजर्षी पुरस्कार जाहीर झाल्याने तालुक्यात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.