Ads
Ads

स्वच्छता दूत सोनाली चितळे यांची पक्षाने नाकारली उमेदवारी! प्रभागातील नागरिकांच्या आग्रहास्तव त्यांनी दाखल केली अपक्ष उमेदवारी!

स्वच्छता दूत सोनाली चितळे यांची पक्षाने नाकारली उमेदवारी! प्रभागातील नागरिकांच्या आग्रहास्तव त्यांनी दाखल केली अपक्ष उमेदवारी!

अहिल्यानगर (प्रतिनिधी )  - अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा चे विद्यमान नगरसेविका स्वच्छता दूत सोनाली ताई अजय चितळे यांची उमेदवारी नाकारून त्यांच्या जागी आयात उमेदवार देण्यात आला. 

             भाजपाने नाकारल्यामुळे  प्रभागातील नागरिक व मतदार चांगले संतापले असून सोनाली ताई चितळे यांच्या मागे भक्कम उभे राहण्याचे आश्वासन देत उमेदवारी अर्ज करण्याची आग्रहाची भूमिका त्यांनी घेतली. त्यांना प्रभागातील मतदारांचा मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळत आहे.

            2018 रोजी भाजपाच्या तिकिटावरती मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे करत त्यांनी प्रभागातील नागरिकांचे मने जिंकली. नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात स्वच्छता दूत म्हणून त्यांनी व त्यांचे पती अजय चितळे यांनी दर रविवारी स्वच्छता मोहीम राबविली. त्याचे शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत.

                 त्यांना कोणतेही राजकीय पार्श्वभूमी नाही तर राष्ट्रसेवेची पार्श्वभूमी आहे. प्रभागातील नागरिकांच्या आग्रहास्तव सोनाली अजय चितळे यांनी प्रभाग क्रमांक 11 मधून अपक्ष उमेदवारी  अर्ज दाखल केला. यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यांच्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे दिसले.