स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रंशात डिक्कर यांच्यावर प्राणघातक हल्ला
जळगाव(प्रतिनिधी):-
स्वराज्य पक्षाचे जळगाव-जामोदचे उमेदवार प्रशांत डिक्कर हे आपल्या सहकाऱ्यासमवेत आज मतदानाच्या निमित्ताने बूथ पाहणी करीता पहाटे शेगाव कडे येण्यास निघाले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या पाच ते सात गुंडांनी त्यांची गाडी अडवली व गाडीवर दगडफेक सुरू झाली. धारधार शस्त्रांनी त्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात प्रशांत डिक्कर व त्यांचे सहकारी चालक गंभीर जखमी झाले असून याचवेळी प्रशांत डिक्कर यांना हृदविकाराचा तीव्र झटका येऊन ते अद्यापही बेशुद्धावस्थेत आहेत. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असून पुढील उपचारांसाठी त्यांना अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
एक विस्थापित भूमिहीन शेतमजुराचा मुलगा, शेतकरी
चळवळीतील सामान्य कार्यकर्ता प्रथापितांसमोर मोठे आव्हान उभे करतो आणि विजयाची वाट धरतो, वैफल्यग्रस्त झालेल्या स्थानिक आमदाराने हा भ्याड हल्ला घडवून आणलेला आहे असा आरोप डिक्कर समर्थकांनी केला आहे. प्रंशात डिक्कर यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे


