Ads
Ads

शिरूरच्या सब-रजिस्ट्रार यांची निवडणूक कामावरील नियुक्ती रद्द करा; घोडनदी बार असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन

शिरूरच्या सब-रजिस्ट्रार यांची निवडणूक कामावरील नियुक्ती रद्द करा; घोडनदी बार असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन

शिरूर (प्रतिनिधी) : शिरूर येथील दुय्यम निबंधक (सब-रजिस्ट्रार) यांची निवडणूक कर्तव्यावर केलेली नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी जोरदार मागणी घोडनदी बार असोसिएशनच्या वतीने शिरूरच्या तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.तहसीलदार यांच्यावतीने नायब तहसीलदार सुवर्णा खरमाटे यांनी स्वीकारले.

शिरूर येथील सब-रजिस्ट्रार यांची 'असिस्टंट इलेक्शन रजिस्ट्रेशन ऑफिसर' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, नजीकच्या तळेगाव ढमढेरे कार्यालयातील कामकाज संथ गतीने सुरू असल्याने आधीच शिरूर कार्यालयावर दस्तनोंदणीचा मोठा ताण आहे. अशात सब-रजिस्ट्रार निवडणूक कामात व्यस्त राहिल्यास मूल्यांकन, मुद्रांक शुल्क व दस्तनोंदणीची कामे ठप्प होऊन पक्षकार, शेतकरी व वकिलांचे मोठे हाल होतील. त्यामुळे ही नियुक्ती तात्काळ रद्द करावी, अशी मागणी बार असोसिएशनने केली आहे.

दरम्यान, निवेदन देण्यासाठी गेलेल्या वकिलांच्या शिष्टमंडळाला तहसील कार्यालयात तब्बल दोन तास ताटकळत बसावे लागल्याने पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

प्रशासनाच्या दिरंगाईवर बार असोसिएशन चे पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली 

"पक्षकार आणि नागरिकांच्या गंभीर प्रश्नावर निवेदन देण्यासाठी आलेल्या वकिलांना तब्बल दोन तास ताटकळत ठेवणे ही अत्यंत संतापजनक बाब आहे. प्रशासनाने वकिलांच्या आणि जनतेच्या वेळेची कदर करायला हवी." — ॲड. रवींद्र खांडरे

"बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाला निव्वळ निवेदन देण्यासाठी दोन तास ताटकळत ठेवणे म्हणजे वकिलांचा आणि संस्थेचा अवमान आहे. प्रशासनाचा हा असंवेदनशील कारभार खपवून घेतला जाणार नाही." — ॲड. विकास बाळासाहेब फडतरे (अध्यक्ष, घोडनदी बार असोसिएशन)

यावेळी प्रमुख उपस्थिती : निवेदन देताना घोडनदी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विकास बाळासाहेब फडतरे, उपाध्यक्ष ॲड. गणेश वामन कळसकर, महिला उपाध्यक्ष ॲड. सौ. किर्ती श्रीकांत, सचिव ॲड. अक्षय विजय पाचर्णे, खजिनदार ॲड. धनंजय दशरथ गायकवाड, सदस्य ॲड. गणेश भाऊसाहेब सटाले, ॲड. गणेश लाला चौगुले, ॲड. भरत प्रभाकर खाडे, सदस्या ॲड. शुभांगी बजरंग गवळी, ॲड. तेजल नितीन गायकवाड, ग्रंथपाल ॲड. सचिन राजू ओहोळ,ॲड. सुरेश पलांडे,ॲड. विरेंद्र सावंत,ॲड. साहेबराव जाधव,ॲड. विलास खांडरे,ॲड. सीमा काशीकर मॅडम,ॲड. अनिल वाखारे,ॲड. दिगंबर भंडारी,ॲड. राहुल बोरा,ॲड. शंकर थोरात,ॲड. निलेश कर्डीले,ॲड. संदीप शेंडकर,ॲड. तेजल गायकवाड,ॲड. कविता कर्डीले,ॲड. करिश्मा बुलाखे,ॲड. आरती सोंडेकर,ॲड. शुभम माळी,ॲड. प्रदीप कापरे,ॲड. संतोष वाखारे,ॲड. प्रतीक काशीकर,ॲड. गणेश शिंदे,ॲड. मयूर साळुंके,ॲड. प्रसाद मैड,ॲड. ननावरे मॅडम,ॲड. ऋषिकेश दळवी,ॲड. संकेत कर्डीले तसेच ॲड. रवींद्र खांडरे यांच्यासह असोसिएशनचे वकील व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.