Ads
Ads

उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी घडवला इतिहास! महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांचा 74500 मताधिक्याने केला पराभव!


शिरूर (प्रतिनिधी)- 
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांचा ७४ हजार ५५० मतांनी दणदणीत विजय झाला.यावेळी ढोल ताशांचा दणदणाट.. तरूणाईचा उत्स्फूर्त सहभाग..ठिक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी..फुलांची उधळण आणि औक्षण करून शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांचे शिरूर शहरात मतदारांनी उत्साहात विजयाचा जल्लोष साजरा केला.
शिरूर हवेलीचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या विजयाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी करून आमदारकीची सर्टिफिकेट त्यांना देण्यात आले.विजयानंतर दिवंगत आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या समाधिस्थळावर जाऊन दर्शन घेतले.
    जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार माऊली आबा कटके व राष्ट्रवादी Image काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्यात सरळ लढत होऊन कटके यांनी  पवार यांचा पराभव केला.महायुतीचे उमेदवार कटके यांचा विजय झाल्यानंतर शिरूर शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली यावेळी ठिक ठिकाणी त्यांचे फटाक्यांची आतिषबाजी,खांद्यावर उचलुन घेऊन विजयाच्या घोषणा देत गुलालाची उधळण करत आणि औक्षण करून शहरात कटके यांचे जल्लोषात विजय साजरा करण्यात आला.यावेळी यावेळी शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील भाजपा - शिवसेना ( शिंदे गट ) - राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) व महायुतीतील घटक पक्षांचे जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल पाचर्णे,माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र जासुद, बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष महेश ढमढेरे, तालुकाध्यक्ष रविबापु काळे,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद,तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे,बाजार समितीचे Image माजी सदस्य विजेंद्र गद्रे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कालेवार,माजी नगरसेवक नितीन पाचर्णे,विनोद भालेराव,संदिप गायकवाड,निलेश गाडेकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षिरसागर,प्रवासी संघाचे अनिल बांडे,भाजपचे मितेश गादिया,विठ्ठल घावटे,आरपीआयचे निलेश जाधव,सुनिल जाधव,रंजन झांबरे,स्वप्निल रेड्डी,केशव लोखंडे,विजय नरके,राजेंद्र महाजन,उमेश शेळके,प्रितेश गादिया,नवनाथ जाधव,सुरेश गाडेकर,सुनिल जठार,पोपट ढवळे,राजेंद्र चोपडा,शैलेश जाधव,निलेश नवले,मयूर थोरात आकाश चाकणे,हर्षद ओस्तवाल,गणेश पाचर्णे,राजु चोंधे,गौरव लोढा,राजु शेख,हुसेन शहा,प्रमोद काका जोशी,भाजपच्या वर्षा काळे,रेश्मा शेख,वैजयंती चव्हाण,माजी नगरसेविका मनिषा कालेवार,पुजा जाधव,ऋतिका झांबरे,प्रिया बिरादार,वैशाली ठुबे,अनघा पाठकजी,पुजा चोंधे यांसह मोठ्या संख्येने महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

चौकट
लोकनेते दिवंगत आमदार बाबुराव पाचर्णे यांना हा विजय समर्पित करतो.त्यांचे विचार पुढे नेण्याचे काम करणार आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मझ्यावर विश्वास टाकून मला उमेदवारी दिली आणि मतदार संघातील मायबाप जनतेने हि निवडणूक हातात Image घेतली.हा विजय शिरुर हवेलीतील मायबाप जनतेचा विजय असून याचे श्रेय शिरूर हवेलीतील जनतेला जाते. 
             ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके