सप्रेम नमस्कार,
राजर्षी शाहू महाराजांच्या समतेच्या आणि लोककल्याणाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी 'राजर्षी शाहू प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य' २०१४ पासून अविरत कार्यरत आहे. यंदाचे वर्ष हे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज ७५० वा समाधी सुवर्ण महोत्सव जयंती वर्ष म्हणून साजरे होत आहे. या मंगलमयी पर्वाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने एक महत्त्वाचा सामाजिक संकल्प सोडण्यात आला आहे.
'व्यसनमुक्ती व गुन्हेगारी मुक्त आदर्श गाव अभियान'
समाजातील वाढती व्यसनाधीनता आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी संस्थेने या अभियानांतर्गत खालील ९ सूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे:
१. सर्वेक्षण व पुनर्वसन: व्यसनाधीन व्यक्तींचे अचूक सर्वेक्षण, तज्ज्ञांमार्फत समुपदेशन आणि त्यांचे पूर्णतः पुनर्वसन.
२. मानसिक आरोग्य शिबिरे: युवक व महिलांसाठी विशेष मानसिक आरोग्य आणि मार्गदर्शन जागृती शिबिरांचे आयोजन.
३. शालेय जनजागृती: शाळा-महाविद्यालयांत जनजागृती कार्यक्रम राबवून तरुणांना व्यसनमुक्तीची शपथ देणे.
४. कौशल्य विकास: गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी युवकांना कौशल्य व उद्योजकता प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवणे.
५. लोकसहभाग: ग्रामसभांच्या माध्यमातून स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची सांगड घालून अभियानात सातत्य ठेवणे.
६. गावोगावी प्रसार: प्रत्येक गावात जाऊन व्यसनमुक्तीचे पथनाट्य व जनजागृती कार्यक्रम राबवणे.
७. तणावमुक्ती शिबिरे: युवक आणि महिलांसाठी आरोग्य तपासणी व मानसिक तणाव मुक्तीसाठी विशेष उपक्रम.
८. मोबाईल हेल्थ क्लिनिक: फिरत्या दवाखान्याद्वारे गावोगावी मोफत आरोग्य तपासणी.
९. नशाबंदी मोहीम: तंबाखू, मद्य आणि इतर अमली पदार्थांविरोधी राज्यव्यापी जनजागृती मोहीम.
राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा - २०२५ व २०२६
गेल्या १० वर्षांपासून राजर्षी शाहू प्रतिष्ठान आणि दक्ष मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान केला जातो.
महत्त्वाची सूचना: अपरिहार्य कारणांमुळे २०२५ चा कार्यक्रम होऊ शकला नाही, त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. म्हणूनच, यावर्षी सन २०२५ आणि २०२६ या दोन्ही वर्षांचा एकत्रित भव्य सोहळा आयोजित केला जात आहे.
कार्यक्रमाचे नियोजित तपशील:
दिनांक: १५ मे २०२६ (शुक्रवार)
स्थळ: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, गंज पेठ, पुणे.
प्रमुख उपस्थिती: महाराष्ट्र राज्यातील माननीय मंत्री महोदय (वेळ लवकरच कळविली जाईल).
नामांकन करण्याची पद्धत: सन २०२६ च्या पुरस्कारांसाठी अधिकृत नामांकन पत्रे सुरू झाली आहेत. इच्छुकांनी संस्थेच्या वेबसाईटवर जाऊन आपले नामांकन सादर करावे.
नामांकनाची अंतिम तारीख: २० एप्रिल २०२६
अधिकृत वेबसाईट: www.rajarshishahupratishthan.com
आपल्या सर्वांच्या सहकार्यातूनच आपण एक व्यसनमुक्त आणि सुसंस्कृत महाराष्ट्र घडवू शकू, असा आम्हाला विश्वास आहे.
आपला नम्र,
श्री. भगवान अंजना रामचंद्र श्रीमंदिलकर
संस्थापक अध्यक्ष, राजर्षी शाहू प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य
संपर्क: ९५४५८९१५१५
वेबसाइट: www.rajarshishahupratishthan.com | www.jagrutshodh.in
ईमेल: rajarshishahupratishthan2014@gmail.com


